विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीतून राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडत असताना आज अचानक महाविकास आघाडी आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष यांच्यातल्या आघाडीची चर्चा सुरू झाली. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करण्याची ऑफर दिली. Pawar – MIM Alliance: Sanjay Raut discusses to join MIM !!
महाराष्ट्रात ही आघाडी राजकीय खळबळ माजवेल, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. परंतु, महाविकास आघाडी आणि एमआयएम या पक्षाची आघाडीची शक्यता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावली. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. 3 पक्ष आधीच आघाडीत आहेत. मला चौथा आणि पाचवा पक्ष त्यात नको, अशा शब्दांमध्ये एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता संजय राऊत यांनी झटकून टाकली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनातील मराठा मुस्लिम काॅम्बिनेशन साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या पक्षाची आघाडी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु, आता संजय राऊत यांनी शिवसेना मात्र यात सहभागी होणार नाही. हे स्पष्ट करून एक वेगळीच भूमिका मांडून घेतली आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेल्या भेटीत महाविकास आघाडीशी युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. आमचा निरोप शरद पवारां पर्यंत पोहोचवा, असे हे राजेश टोपे यांना म्हणाले होते. यानंतर महाविकास आघाडी आणि एमआयएम या पक्षांच्या आघाडीची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली.
परंतु एमआयएम पक्षाचे राजकीय अस्तित्व मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या मुस्लिम भाऊ बहुल भागात आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे राजकीय संघटन वेगळ्या पद्धतीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएम पक्षाबरोबर आघाडी केल्याने शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला छेद जातो हे लक्षात घेऊन संजय राऊत यांनी एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याचे सर्व संकेत फेटाळून लावले आहेत. मात्र याबाबत शरद पवार यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट व्हायची आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App