विठ्ठल सहकारी कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव, प्रवीण दरेकर यांचा आरोप


शेतकऱ्यांची अस्मिता असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव आहे. यामुळेच संपूर्ण पवार कुटुंब पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात फिरत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.Pawar family plot to grab Vitthal co-operative factory, Praveen Darekar alleges


विशेष प्रतिनिधी 

मंगळवेढा : शेतकऱ्यांचीअस्मिता असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव आहे. यामुळेच संपूर्ण पवार कुटुंब पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात फिरत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील आयोजित सभेत बोलताना दरेकरे म्हणाले की, आजपर्यंत पवार कुटुंबीयांना राज्यातील अनेक साखर कारखाने हडप केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा डोळा आता विठ्ठल साखर कारखान्यावर असल्याने त्यांचे सर्व कुटुंबीय प्रचारासाठी मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघात येत आहे.



बळीराजाकडे यांनी दुर्लक्ष केले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यां च्या नुकसान पाहणी करण्यासाठी आम्ही आज गेलो होतो. प्रचारासाठी आलेल्या एकाही मंत्र्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाण्याची तयारी दर्शवली नाही.

सरकारमधील मंत्री नुसती पोकळ आश्वासने देऊन जातात. मराठा समाजाच्या जीवावर आजपर्यंत यांनी राजकारण केले; पण त्यांनी आरक्षण दिले नाही. भाजप सरकारने दिलेले आरक्षणसुद्धा या ठाकरे सरकारने काढून घेतले. हा अन्याय मराठा समाजावर झाला आहे.

राष्ट्रवादी म्हणजे भूलभुलैया पार्टी असून त्यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकरी देशोधडीला लागला असताना हे सरकार बिल्डरांना सवलत देण्यात मग्न असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला

Pawar family plot to grab Vitthal co-operative factory, Praveen Darekar alleges

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात