प्रतिनिधी
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली. रात्री 8 वाजता त्या ईडी कार्यालयातून बाहेर आल्या. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे.patra chawl scam Varsha Raut interrogated for 9 hours, investigation into account transactions underway
हे पैसे खात्यात आले कसे, याबाबत वर्षा राऊत यांची चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत याने १ कोटी ६ लाख रुपये हस्तांतरित केले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीकडून वर्षा यांच्या खात्यांची कसून तपासणी सुरू आहे.
संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करता पैसे लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनच्या काही जणांना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App