विशेष प्रतिनिधी
पुणे:सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील रोज काही ना काही कारणानं माध्यमांमधून चर्चेत असते.. असा एकही दिवस नाही .. ज्या दिवशी गौतमीची किंवा तिच्या कार्यक्रमाची बातमी नाही..“Patlin Hais Rubabaat Naach” post by actor Kiran Mane in support of Gautami Patil..
सबसे कातील गौतमी पाटील .. असं म्हणत हजारो प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये गोंधळ होतो.. अनेक ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागतो पोलिसांना तिला सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागते..
मात्र असं असलं तरीही महाराष्ट्रात गौतमची क्रेझ कमी होत नाहीं..
महाराष्ट्रात तिचा चाहता वर्गही आहे .. आणि टीकाकार देखील आहेत.. कधी तिच्या नृत्यावर आक्षेप घेतल्या जातो.. तर कधी तिच्या पोशाखा वर सध्या मात्र गौतमी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे..
एका मराठा संघटनेने तिच्या पाटील आडनावावर आक्षेप घेतला आहे.
तू पाटील आडनाव काढून टाक.. नाहीतर महाराष्ट्रात तुझे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाहीत.. अशी धमकी त्या संघटनेच्या वतीने गौतमीला देण्यात आली आहे.. मी पाटील आहे, तर पाटील आडनाव लावणार असं गौतमीने प्रसारमाध्यमातून त्यांना ठणकावून सांगितले.. माझ्या “बाबत बरच काही काही बोललं जात आहे.. मी त्याकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष करते .. अस गौतमी म्हणाली..
View this post on Instagram A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)
या सगळ्या आडनावाच्या वादात आता अभिनेते किरण माने सक्रिय झाले आहेत. किरण माने कायमच समाज माध्यमातून सक्रिय असतात.. ज्वलंत विषयावर ते आपली मत मांडत असतात.. पुरोगामी विचारांसाठी माने ओळखले जातात..” पाटलीन हायस तर रुबाबात नाच “असं म्हणत किरण माने यांनी गौतमीला सपोर्ट केलाय.. त्यांनी एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून गौतमीच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे त्या पोस्ट मध्ये माने लिहीतात..
“एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.” किरण माने कायमच.. मराठी चित्रपट विश्वात घडणाऱ्या घटनां, राजकीय घटना यावर आपलं परखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या गौतमीच्या आडनावावरून सुरू असलेल्या वादात तिला समर्थन दिले..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App