मागील लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ राजकारणातून गायब झाले होते. मात्र, आता किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅक्टीव्ह झाले आहेत. मावळमधील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेऊन असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र, हा इशारा विरोधकांना, स्वपक्षियांना की राज्यात आघाडी असलेल्या मित्र पक्ष शिवसेनेच्या खासदाराला हे गुलदस्त्यात आहे.Parth Pawar is active again, tweet that I am keeping an eye on everything in Maval, but a warning to whom?
विशेष प्रतिनिधी
पुणे: मागील लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ राजकारणातून गायब झाले होते. मात्र, आता किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅक्टीव्ह झाले आहेत. मावळमधील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेऊन असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र, हा इशारा विरोधकांना, स्वपक्षियांना की राज्यात आघाडी असलेल्या मित्र पक्ष शिवसेनेच्या खासदाराला हे गुलदस्त्यात आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हे मावळ या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पवार यांचा त्या निवडणुकीत पराभव केला होता. आता शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीची आघाडी असल्याने या जागेचे काय होणार याबाबत संभ्रम आहे. मात्र, पवारांनी सोशल मीडियाद्वारे इशारे द्यायला सुरूवात केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी येताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. अपघात वाढले आहेत. पवन-अंदर मावळातील अशा प्रश्नांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे. मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे.
मावळ मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले असतानाही पवार मावळ भागातील विविध प्रश्नांवर बोलू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्विट करत शेतकऱ्यांना मदत मिळण्याची मागणी केली होती. त्या ट्विटमध्ये पार्थ पवार म्हणाले होते की, ‘अवकाळी पावसामुळे मावळ परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांच्या पावसाने कापणीला आलेला भात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाद्वारे मावळातील शेतकऱ्याना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरातील बºयाच रुग्णालयातील फायर ¸ऑडिट न झाल्याने पवार यांनी चिंताही व्यक्त केली होती. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास लागलेल्या आगीची दुर्घटना दुदैर्वी असून उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असं ट्विट पवार यांनी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App