प्रतिनिधी
ठाणे : उल्हासनगरमधील वादग्रस्त नेते आणि माजी आमदार पप्पू कलानी हे स्वगृही आले आहेत. त्यांच्या गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत.या नगरसेवकांमध्ये पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांचाही समावेश आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशापूर्वी भाजप नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.Pappu Kalani back home in Ulhasnagar; 21 corporators of Kalani group in NCP; Push the BJP
कालच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत कलानी गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश समारंभाला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. पप्पू कलानी गटाच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे उल्हासनगर पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या सत्तांतरातून राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
उल्हासनगरातून भाजपचा सुपडा साफ; टीम ओमी कलानी आणि 21 नगरसेवकांसह 114 जणांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश…@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule pic.twitter.com/E75xbA2O5S — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 27, 2021
उल्हासनगरातून भाजपचा सुपडा साफ; टीम ओमी कलानी आणि 21 नगरसेवकांसह 114 जणांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश…@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule pic.twitter.com/E75xbA2O5S
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 27, 2021
कारण उल्हासनगरमधील हे २२ नगरसेवक भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. सर्व नगरसेवक कलानी गटाचे आहेत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला हा धक्का मानला जात आहे.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App