करुणा शर्मा प्रकरणात पंकजा मुंडे यांची प्रथमच प्रतिक्रिया, परळी सुन्न, मान खाली गेली राज्याची


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदार करुणा शर्मा यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रथमच सूचक प्रतिक्रिया देत परळी सुन्न, मान खाली गेली राज्याची असे म्हटले आहे.Pankaja Munde’s first reaction in Karuna Sharma case,

गाडीत पिस्तूल सापडले म्हणून करुणा शर्मा यांना अटक करून 14 दिवस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणावर विरोधकही गप्प आहेत. पंकजा मुंडे यांनीही कोणाचेही नाव न घेता, “परळी सुन्न आहे. मान खाली गेली आहे राज्याची” असे म्हणत ट्विट केले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून शासन, प्राशन आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



करूणा शर्मा यांनी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचे पुरावे देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्या परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या, मात्र पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्या गाडीत पिस्तूल सापडले. या दरम्यान गाडीत काहीतरी ठेवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर ॲट्रॉसिटी, चाकूहल्ला हे गुन्हेही दाखल झाले.

Pankaja Munde’s first reaction in Karuna Sharma case,

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात