जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले

प्रतिनिधी

गोपीनाथ गड – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज गोपीनाथ गडावरून सुरूवात झाली. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे हजर होत्या. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनाच्या घोषणा देताना डॉ. भागवत कराड यांच्या विरोधात घोषणा दिल्या.pankaja munde got angry with BJP workers over sloganiaring against dr. bhawat karad in janashirwad yatra

त्यावेळी डॉ. भागवत कराड यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे भडकल्या. त्यांनी पुढे येऊन घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अत्यंत कठोर शब्दांत सुनावले. त्या म्हणाल्या, हे काय चालले आहे… हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का… भाजपचाच कार्यक्रम आहे ना….अशा घोषणा द्यायला काय मी शिकवल्या का तुम्हाला… गोपीनाथ मुंडे अमर रहे ही घोषणा मी रोखत नाही.



मुंडे साहेबांवर आपले प्रेम आहे. पण हे काय अंगार है, भंगार है चालवलेय… मी घोषणा देणाऱ्यांना पाहिले आहे. माझ्या उंचीप्रमाणे आपली लायकी ठेवा. अन्यथा माझ्याकडे भेटायला पुन्हा माझ्या दारात येऊ नका, अशा कडक शब्दांत पंकजा मुंडे घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा समाचार घेतला आणि त्या निघून गेल्या.

pankaja munde got angry with BJP workers over sloganiaring against dr. bhawat karad in janashirwad yatra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात