केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार

केंद्र सरकार रेमडेसिवर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवू नये यासाठी कम्पण्यावर दबाव आणत आहे असा धादांत खोटा आरोप आहे. केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.Panic spreads rumors against Central Government, file case against Nawab Malik, Atul Bhatkhalkar lodges complaint at Dindoshi Police Station


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : केंद्र सरकार रेमडेसिवर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवू नये यासाठी कम्पण्यावर दबाव आणत आहे असा धादांत खोटा आरोप आहे. केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण

निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवर इंजेक्शन देऊ नये अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती दिली.

केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण करून राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले, इतकेच नव्हे तर प्रसार माध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केली.

यामुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली, रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांचे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे नवाब यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

राज्य सरकारने पुढील 48 तासांत मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आपण अशीच तक्रार केली होती. त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून उच्च न्यायालयाने तपासाचे आदेश दिले होते, असेही त्यांनी सांगितले.

Panic spreads rumors against Central Government, file case against Nawab Malik, Atul Bhatkhalkar lodges complaint at Dindoshi Police Station