विशेष प्रतिनिधी
मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, उर्वरीत करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्या विधानावर फडणवीसांना इशारा देत कुणाचाही नाद करा पण पवारांचा नाद करू नका असे धनंजय मुंडे म्हणाले. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ते ब्रम्हपुरीत बोलत होते.Pandharpur-rain meeting Correct Program stormed the election Fadnavis-Munde clashed
‘भारतनाना भालके भाषणात नेहमी म्हणायचे, ‘मी कच्चा गुरुचा चेला नाही.’ नानांचे ते भाषण आपण सर्वांनी ऐकले. पण, काल येथे येऊन गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलं नसेल का. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा पावसात झाल्याचे त्यांना कोणीतरी सांगितले. पावसात कोणाचीही सभा झाली की त्याची धास्ती फडणवीस यांना एवढी बसते की ते बोलून जातात की आम्हाला पावसाची गरज लागत नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करताना पावसातील सभेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केले होते.मला आताच खासदार रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले देवेंद्रजी आता पावसात सभा घेण्याची तुमची बारी आहे. पण, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही, असा टोला शरद पवार आणि जयंत पाटील यांना लगावला.
महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन आचार, विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे. एका निवडणुकीने सरकार बदलत नसले तरी, लोकशाहीत सरकारचा दुराचार वाढल्यानंतर त्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मताचा अधिकार सर्वात मोठा असल्याचे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App