विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण पावसाने झोडपले. शेतकऱ्याची शेती पुराच्या पाण्याखाली गेली. अजून पंचनामे झालेले नाहीत. ठाकरे – पवार सरकारने शेतकऱ्यांना अजून मदत जाहीर केलेली नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ठाकरे – पवार सरकारने वार्यावर सोडले आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लखीमपूर खीरीवर लागले आहे. Opposition leaders on political tourism, but no one turns to Maharashtra’s flood affected areas
शरद पवारांपासून रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लखीमपूर खीरीच्या घटनेवर एकापाठोपाठ एक ट्विट केली आहेत. पण यापैकी कोणीही महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर चकार शब्द बोलले नाहीत. शरद पवार यांनी काल रात्री उशिरा लखीमपुर खीरीच्या घटनेवर ट्विट करून योगी सरकारचा निषेध केला आहे.
रुपाली चाकणकर यांनीदेखील ट्विट करूनच तिथल्या शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवला आहे. पण महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अजुन पंचनामे देखील झाले नाहीत याविषयी मात्र राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने चकार शब्द काढलेला नाही.
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर मोदी आणि योगी सरकारला ब्रिटिश सरकारची उपमा देऊन टीकास्त्र सोडून घेतले आहे. परंतु, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल डोळ्यातून अश्रूचा एकही थेंब काढलेला नाही. छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, अखिलेश यादव हे नेते लखीमपूर खीरीच्या पोलिटिकल टुरिझम वर निघाले पण यापैकी एकही महाराष्ट्राच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे वळलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App