एकीकडे प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला आघाडीची ऑफर; दुसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर शरसंधान

प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांना आघाडी करण्याची ऑफर देतात, तर दुसरीकडे हेच प्रकाश आंबेडकर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीकास्त्र सोडतात. On the one hand Prakash Ambedkar’s offer of leadership to Congress

आजच्या पत्रकार परिषदेत हे घडले आहे. राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेवर प्रश्न विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी या यात्रेचा नेमका हेतूच समजत नाही. त्यामुळे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा एक प्रकारे ब्लाइंड मार्च किंवा ब्लँक मार्च आहेत असेच वाटते, असे शरसंधान साधले.



त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध निर्णयावर त्यांनी टीका केली. मोदींच्या निर्णयावर आता सुप्रीम कोर्ट देखील प्रश्न विचारू लागले आहेत. नोटबंदी मागची कारणमीमांसा कोर्टाने विचारली आहे, इतकेच नाही तर अनेक बुद्धिमंतही त्यांच्या निर्णयाला आक्षेप घेऊन प्रश्न विचारत आहेत. परंतु, मोदींना बुद्धिमत्तांचे लिखाण चालत नाही. त्यामुळे त्यांना ते शहरी पेन नक्षलवादी असे संबोधत आहेत. इथून पुढे बुद्धिवाद्यांनी आपल्याला नक्षलवादी म्हणून घ्यावे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

गेले अनेक दिवस प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करून निवडणूक लढविण्याचे ऑफर देत आहेत. परंतु दोन्ही पक्षांनी अद्याप त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यातच आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर शरसंधान साधल्याने काँग्रेसची आघाडी करण्याच्या त्यांच्या ऑफरचे नेमके काय झाले?, असा सवाल असा विचारण्यात येत आहे.

On the one hand Prakash Ambedkar’s offer of leadership to Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात