विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनने अरुणाचल प्रदेशात उभारलेले गाव उखडून फेका, काश्मीरमधील बॉम्ब हल्ले थांबवा. मग अन्य काही उखडून फेकण्याच्या गोष्टी बोला, असा टोला शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लगावला आहे.On the border with China Uproot the village
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेकण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.ते म्हणाले, भाजपला प्रयत्न करूनही राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही.
दहशत, दबाव करूनही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे वैफल्य आले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने एक गाव बसवलं आहे. ते उखडून फेकलं पाहिजे. काश्मीरमध्ये बॉम्ब हल्ले होत आहेत. ते उखडाव मग बोलावं…
नोटबंदी बाबत पंतप्रधानांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App