श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे भक्तांना ऑनलाइन दर्शन;  अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर सजले

विेशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. कोरोना आणि पावसामुळे अनेकांना दर्शनासाठी जाता आले नाही. त्यामुळे तमाम भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ ऑनलाइन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. On occasion of Angarki chaturthi Online darshan of shrimant Dagdusheth Ganapati to devotees

अंगारकी चतुर्थीच्यानिमिताने ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी आहे. परंतु, भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. भक्तांनी गर्दी न करता ऑनलाईन बाप्पाच दर्शन घ्यावे, असं आवाहन देखील करण्यात आले आहे.

  • श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे भक्तांना ऑनलाइन दर्शन
  • दर्शनासाठी भाविकांनी केली होती पहाटेपासून गर्दी
  • अंगारकी चतुर्थीच्या निमित्त नेत्रदीपक आरास
  • फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली
  • ऑनलाइन श्रींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

On occasion of Angarki chaturthi Online darshan of shrimant Dagdusheth Ganapati to devotees