विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएन्ट मुळे जगभरात काळजी वाढली आहे. पुन्हा या व्हायरसचा प्रसार होऊ नये आणि कोरोनाने आपले डोके पुन्हा वर काढू नये यासाठी सर्वच देश सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तर भारतातील राज्ये देखील ह्याबाबत जागरूक झाल्याचे पाहायला मिळते. कर्नाटक राज्याने देखील आपल्या सीमारेषेवर तपासणी पथके सज्ज केली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडक नियम लागू केले.
Omaicron: Strict restrictions again in Kolhapur
Omicron चे चीन कनेक्शन काय? WHOने कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव हेच का ठेवले? वाचा सविस्तर..
जिल्ह्यात येणार्या प्रवाशांना आयसीसीआर टेस्ट आणि कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे जे लोक मास्क न घालता फिरत आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात काल एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आला नाही. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढली नाहीये. त्यामुळे पुन्हा कोरोनाने डोके काढू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App