ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचं संकट आहेत. अशातच पार्ट्या आणि कॉन्सर्टच्या निमित्ताने गर्दी होत आहे.Omaicron likely to impose restrictions on December 31 parties; Hints given by Mayor Kishori Pednekar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना नंतर आता ओमायक्रॉन या विषाणूने सगळीकडे भीतीच वातावरण निर्माण केलं आहे.महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सांगितले की, सोमवारी समोर आलेल्या रुग्णांपैकी एक पुण्यातील ३९ वर्षीय महिला आहे तर दुसरा लातूरचा ३३ वर्षीय पुरुष आहे.
दरम्यान ओमायक्रॉनमुळे ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध येण्याची शक्यता अधिक आहे. सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल,तसेच सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचं संकट आहेत. अशातच पार्ट्या आणि कॉन्सर्टच्या निमित्ताने गर्दी होत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना परवानगी देतांना खूप विचार करावा लागेल,लोकांनी नियम पाळले नाहीत तर याचा परिणाम थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर होऊ शकतो, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App