“संगीत का महासागर” ! 25 वर्ष-2 लाख पानं -4 मजली इमारतीएवढा जाड संगीत ग्रंथ – जगातलं पहिलं मोठं पुस्तक- विराग मधुमालतींचा नवा विश्वविक्रम


  • विराग मधुमालती ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी सज्ज.
  • 25 वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल 17 लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विराग मधुमालती ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. 25 वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल 17 लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा 2 लाख पानांचा आणि चक्क 40 फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ “संगीत का महासागर” या नावाने निर्मित केला जाणार आहे. अशाप्रकारचा 40 फुट उंच म्हणजेच एकंदरीत 4 मजली इमारतीच्या उंचीचा हा संगीतग्रंथ जगात एकमेव असणार आहे. “Ocean of music”! 25 years – 2 lakh pages – 4 storey building-thick music book: The world’s first big book – Virag Madhumalati’s new world record

असा असेल ग्रंथ

अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल 17 लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा २ लाख पानांचा आणि चक्क ४० फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ “संगीत का महासागर” या नावाने निर्मित केला जाणार आहे. अशाप्रकारचा 40 फुट उंच म्हणजेच एकंदरीत 4 मजली इमारतीच्या उंचीचा हा संगीतग्रंथ जगात एकमेव असणार यात निश्चितच काही शंका नाही. “संगीत का महासागर” या ग्रंथातील सर्व 17 लाख संगीत अलंकाराचा मजकुर लिहून झाला असून त्याबद्दलची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.

विराग मधुमालती

विश्वविक्रम करण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे विराग मधुमालती यांनी त्यांच्या या नव्या विश्वविक्रमासाठी 1996 पासून रियाझ आणि अलंकारांच्या निर्मितीसाठी अभ्यास करत आहे. कलेचे जाणकार विराग मधुमालती यांनी गेली २५ वर्ष कलेसाठी अर्पित केली आहेत आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीचे यश म्हणजेच हा संगीतग्रंथ आहे असे ते सांगतात.

“Ocean of music”! 25 years – 2 lakh pages – 4 storey building-thick music book: The world’s first big book – Virag Madhumalati’s new world record

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”