राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे सुहास कांदे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर नोंदवत थेट दिल्लीतल्या मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची मतमोजणी लांबणीवर पडत आहे. Objections to the votes of Suhas Kande, Yashomati Thakur and Jitendra Awhad
परंतु या संदर्भात जन प्रतिनिधित्व कायदा कलम 324 निवडणूक आयोगाला विशिष्ट अधिकार प्रदान करते आणि यातून निवडणूक आयोग आक्षेप असलेल्या मतांबाबत निर्णय देतो याची साक्ष नजीकच्या इतिहासात सापडते.
– 2017 ची अहमद पटेल यांची निवडणूक
2017 मध्ये काँग्रेसचे चाणक्य मानले गेलेले नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याविरुद्ध त्यांचे जुने सहकारी परंतु नंतर भाजप मध्ये आलेले बलवंत राजपूत यांच्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी लढत झाली होती. त्यावेळी झालेल्या मतदानानंतर काँग्रेसच्या निवडणूक प्रतिनिधींनी 2 आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला होता. या 2 आमदारांनी मतदान करून बाहेर आल्यानंतर अमित शहा यांच्या दिशेने दोन बोटे उंचावत “व्हिक्टरी साईन” केली. त्यामुळे त्यांनी आपले मतदान फोडले, असा आक्षेप काँग्रेसच्या निवडणूक प्रतिनिधींनी दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडे नोंदवला होता.
Nawab Malik ED : नवाब मलिक हटाव मोहीमेवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांची स्वाक्षरी; जितेंद्र आव्हाड आले बचावाला
– 2 मते केली होती रद्द
दिल्लीच्या निवडणूक आयोगाची त्यावेळी 4.00 तास बैठक झाली आणि रात्री 12.00 वाजता त्यांनी संबंधित 2 आमदारांची मते रद्द करण्याचा निर्णय दिला. जन प्रतिनिधित्व कायदा कलम 324 निसा नुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला होता. या निर्णयाचा परिणाम म्हणून अहमद पटेल हे विजयी होऊन तेव्हा राज्यसभेत पोहोचले होते.
– मतपत्रिका हाताळायला दिल्या
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक 2022 यामध्ये भाजपने याच कलमाच्या आधारे शिवसेनेचे सुहास कांदे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. या तीनही नेत्यांनी आपापल्या मतपत्रिका आपापल्या पक्षाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना हाताळायला दिल्या हा तो आक्षेप आहे. पक्षाच्या व्हीप नुसार आमदारांनी मतदान केले की नाही हे मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्याला दाखवून खात्री करून देणे यात नियमबाह्य आणि गैर नाही. परंतु, मतपत्रिका थेट हाताळायला देणे हा कायद्याचा भंग आहे, असा आक्षेप भाजपने घेतला आहे.
आता यासंदर्भात दिल्लीतल्या निवडणूक आयोगाची बैठक होऊन काय निर्णय येतो त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यावर कोणता संजय राज्यसभेत राज्यसभेत पोहोचणार आणि कोणता संजय घरी जाणार?, हे अवलंबून असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App