मराठा आरक्षण आंदोलनात आता दोन राजे, उदयनराजेही सहभागी होणार


खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची हाक दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. आता या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी होणार आहे.Now two kings, Udayan Raje will also participate in the Maratha reservation movement


प्रतिनिधी

सातारा: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची हाक दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. आता या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी उदयनराजे तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दोºयावर आहेत. या दौºयात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत.

यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयारउदयनराजे यांनी ट्विट करून हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीविषयी माहिती दिली.

हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे.

या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

संभाजीराजे छत्रपती यांना भाजप डावलत आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांना विचारला असता, संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. संभाजीराजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे,

यासाठी सर्व राजकीय पक्ष, तसेच संघटनांना भेटत आहेत. आम्ही भाजप म्हणून सवतासुभा मांडलेला नाही. त्याची गरजही नाही. हे आंदोलन राजकीय पक्षांचे नाही, समाजाचे आहे.

समाजासाठी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण कसे मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न आहे,असे पाटील यांनी स्पष्ट केले.मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय झाल्यावर उदयनराजे म्हणाले होते की,

हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका.

Now two kings, Udayan Raje will also participate in the Maratha reservation movement

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण