विधानसभा अध्यक्षांच्या नावावर देखील आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं.Now reshuffling the state cabinet before the winter session; The names of two leaders from the Congress are under discussion
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महविकास आघाडी सरकारमध्ये मागील काही दिवसांपासून फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान आता हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसमधून दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. मंत्रिमंडळाच्या या दोन पदांसाठी खुद्द नाना पटोले यांचं नाव समोर येत आहे. तर सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा अद्याप रिक्तच आहे. अशातच आता नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यावर आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.विधानसभा अध्यक्षांच्या नावावर देखील आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App