आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता; अडचणींमध्ये वाढ


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता सीबीआय अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या केसच्या आधारे EDकडून PMLA केस केली. त्यानंतर आता सीबीआय अर्ज करून कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झी २४ तासने ही बातमी दिली आहे. Now it is likely to seek custody of Anil Deshmukh in CBI court; Increase in difficulties

मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीच्या विशेष कोर्टान हा निर्णय सुनावला आहे. सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी बार मालकांची यादी दिली होती, त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जात होती असा दावा ईडीने सुनावणीत केला. या प्रकरणात देशमुख – वाझेंचा मोठा सहभाग असल्याचे ईडीने नमूद केले आहे.अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. त्यानंतर ईडीने 12 तास चौकशी करुन त्यांना अटक केली होती. तर शनिवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

अनिल देशमुखनंतर मुंबईतील ईडी कार्यालयात ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. पण ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

Now it is likely to seek custody of Anil Deshmukh in CBI court; Increase in difficulties

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण