महापालिकेच्या ७९ हजार कोटींच्या ठेवी आहेत, मग त्याचा उपयोग काय? ; पडळकरांची ठाकरे सरकारवर टीका


जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. NMC has deposits of Rs 79,000 crore, so what is the use of it? ; Padalkar criticizes Thackeray government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एस्टी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनावरून पुन्हा एकदा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.पडळकर म्हणाले की ,” मुंबईत आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र महापालिका आणि सरकारकडे येवढे सुद्धा पैसे नाहीत की त्यानी कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी साधे पाणी देखील दिले नाही.”

सरकारची राक्षसी वृत्ती..

महापालिकेच्या ७९ हजार कोटींच्या ठेवी आहेत, मग त्याचा उपयोग काय? अशा शद्बात पडळकर यांनी टीका केली आहे. पुढे पडळकर म्हणाले की सरकारची ही राक्षसी वृत्ती आहे, मात्र त्यांनी लक्षात ठेवावे कितीही गौरसोय झाली तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देखील यावेळी पडळकर यांनी दिला आहे.सरकारने लवकरच आंदोलनावर तोडगा काढावा

सरकारने आता लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा. अनिल परब हे निर्णयाची कॉपी घेऊन आंदोलनस्थळी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आमचे अन्यायाला वाचा फोडण्याचे कामच आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

परब म्हणतात मी कर्मचाऱ्यांसाठी २४ तास उपलब्ध

पडलकरंनी अनिल परब यांच्यावर आरोप करताना म्हणाले की परिवहन मंत्री माध्यमांसमोर छान बोलतात, मात्र जेव्हा कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ अनिल परब यांच्याकडे चर्चा करण्यासाठी जाते तेव्हा ते त्यांना बोलत देखील नाहीत. आणि वरून पुन्हा माध्यमांसमोर येऊन सांगतात की, मी कर्मचाऱ्यांसाठी २४ तास उपलब्ध असतो.

हे सरकार दुतोंडी आहे

ठाकरे सरकारच्या काळात राज्यावर दोनदा चक्रिवादळ आले, अतिवृष्टी झाली. या नैसर्गीक अपत्तीमध्ये जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदतीची अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली नाही. सरकार हे दुतोंडी असून, ते कधीही एका भूमिकेवर ठाम राहात नाही.तसेच हा संप चिरडवून टाकण्याचा सरकारचा मोठा डाव आहे.अस देखील पडळकर म्हणाले.

NMC has deposits of Rs 79,000 crore, so what is the use of it? ; Padalkar criticizes Thackeray government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण