गडकरींचा ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब : थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहून तक्रार, स्थानिक शिवसेना नेत्यांमुळे रस्त्यांची अनेक कामे रखडली

Nitin Gadkari Letter To CM Uddhav Thackeray on Shiv Sena Leaders interference in national highways work

Nitin Gadkari Letter To CM Uddhav Thackeray :  सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेले केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या पत्रात नितीन गडकरी यांनी स्थानिक नेते राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचे त्यात म्हटले आहे. Nitin Gadkari Letter To CM Uddhav Thackeray on Shiv Sena Leaders interference in national highways work


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेले केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या पत्रात नितीन गडकरी यांनी स्थानिक नेते राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचे त्यात म्हटले आहे.

कोणत्या कामांमध्ये शिवसेना नेत्यांकडून अडथळे?

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात कोणत्या कामांमध्ये शिवसेना नेत्यांकडून अडथळे आणले जात आहेत त्याची यादी दिली आहे.

१. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

४. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

५. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.

…तर महाराष्ट्रात नवीन रस्त्याची मंजुरी देताना विचारा करावा लागेल

गडकरी आपल्या पत्रात म्हणाले की, मागच्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामे रखडली आहेत. माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही कामे थांबवली असल्याचं मला कळलं. तसेच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरू राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असा इशाराही गडकरींनी सीएम ठाकरेंना दिला आहे.

काम बंद पाडेपर्यंत लोकप्रतिनिधींची मजल गेली

अधिकारी किंवा कंत्राटदारांनी त्यांचे ऐकले नाही तर कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडेपर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेल्याचे गडकरींनी पत्रात लिहिले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nitin Gadkari Letter To CM Uddhav Thackeray on Shiv Sena Leaders interference in national highways work

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण