विशेष प्रतिनिधी
पुणे : सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा २४ वा वर्धापनदिन आणि स्व. बन्सीलालजी चोरडिया यांच्या १८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा ‘सुर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-२०२२’ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक व स्कार्फ असे पुरस्काराचे स्वरूप होते. Nitin Gadkari awarded ‘Suryadatta National Lifetime Achievement Award’ by ‘Suryadatta’
मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ‘सुर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते गडकरी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार प्रकाश आवाडे, ‘सूर्यदत्त’मधील रोशनी जैन, योगिता गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
NITIN GADKARI : NH48 मुंबई- दिल्ली 12 तासात ; नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आणि नवीन अर्थसंकल्पीय दृष्टिकोनातून ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी ‘सुर्यदत्त’च्या २४ व्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सार्वजनिक सेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नितीन गडकरी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की, शिक्षण ही एक मुलभूत आणि मौल्यवान संपत्ती आहे. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचला पाहिजे. त्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक नागरिक सक्षम झाला पाहिजे. याकरिता सर्वच संस्थांनी प्रयत्न केला पाहिजे. आयातीपेक्षा निर्यात कसे वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. या सर्वांकरिता दिशा ठरवून, योग्य मार्गाने, गांभीर्याने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App