Baba Nithyanand – श्रद्धा ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपली कशावर तरी श्रद्धा असणं हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतं. पण ही श्रद्धा जेव्हा अंधश्रद्धा बनते तेव्हा काही भोंदूबाबा त्याचा गैरफायदा घेतात. अशा काही ढोंगींमुळं मग सर्वच साधु संतांकडे लोक संशयानं पाहू लागतात. असाच एका ढोंगी किंवा त्याला बलात्कारी म्हणता येईल असा बाबा म्हणजे नित्यानंद. बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंद भारतातून फरार झाला आणि इक्वाडोरजवळ त्यानं एक बेट विकत घेत त्यावर अक्षरशः स्वतःचा देश निर्माण केल्याचा त्याचा दावा आहे. त्याला त्यानं कैलाश असं नाव दिलं असून ते जगातलं एकमेव हिंदूराष्ट्र असल्याचा त्याचा दावा आहे. स्वतःला जणू देवच समजणाऱ्या या नित्यानंदला आता मात्र कोरोनाची भीती वाटायला लागलीय. कारण त्यानं त्याच्या देशात कोणीही येऊ नये असं फर्मान काढलंय. Nithyanand banned entry in his country Kailash amid cororna spread threat
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App