प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर साखर कारखाना घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापे घातले. या छाप्यांच्या मुद्द्यावर हसन मुश्रीफ यांनी सरकार विशिष्ट जाती-धर्माच्याच लोकांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला. नवाब मालिकांना अटक झाली. आता माझ्यावर म्हणजे मुश्रीफांवर कारवाई करत आहेत. अस्लम शेख यांनाही कारवाईची धमकी दिली आहे. याचा अर्थ ते विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करत आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. Nitesh Rane’s Hasan attacks Mushrif; Didn’t you remember religion while doing corruption?
मात्र या आरोपावर भ्रष्टाचार करताना तुम्हाला धर्म आठवला नाही का?, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी हाणला आहे.
हसन मुश्रीफ यांच्यासंबंधित कोल्हापूर आणि पुण्यातील काही ठिकाणी आज सकाळी ६ वाजल्यापासून ईडीने छापे घातले. आज 14 तास छापे घालून काही कागदपत्रे घेऊन ईडीसी अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले आहेत यानंतर ईडीचे पुढचे पाऊल काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पण भाजपचे आमदार नितेश राणेंनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का? ईडीची कारवाई सुरू असतानाचे का आठवतो? असा खोचक सवाल नितेश राणेंनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले :
काही केलं नसेल किंवा भ्रष्टाचार झाला नसेल तर घाबरण्याची काय गरज आहे? एवढा थयथयाट करण्याची काय गरज आहे? यांनी कितीही भ्रष्टाचार करायचा, कितीही चोऱ्यामाऱ्या करायच्या, यांनी कितीही आमच्या महापुरुषांना अपमानास्पद बोलायचं, अपशब्द वापरायचे. मग दिलगिरी व्यक्त केली तर तेव्हा महाराष्ट्राने स्वीकारायचं. भ्रष्टाचार झाला तर यांना टार्गेट केलं जात. मग यांची जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती. तेव्हा आमची घर तोडली, आमच्यावर चुकीच्या केसेस टाकल्या, खोट्या केसेस टाकल्या, अटक केले. आमच्या असंख्या कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केले.
– ईडी असो, सीबीआय असो, एनआयए असो किंवा इन्कम टॅक्स असो ते जाती, धर्म बघून कधीही कोणावर कारवाई करत नाहीत किंवा तपास करत नाहीत. पण भ्रष्टाचार करत असताना तेव्हा धर्म आठवला नाही का? तेव्हा या सर्व गोष्टी बोलाव्याशा वाटत नाहीत का? तुम्हाला विशिष्ट धर्म म्हणजे कुठला धर्म बोलायचा आहे? एवढ्या दहशतवादी कारवाया होतात, चुकीची काम होतात, मटका, जुगार वगैरै हे सर्व होत. त्याच एका धर्मावर बोटं का लोकं उचलतात. हल्ली पण मुंबईवर बॉंम्ब ब्लास्ट करण्याचे जे काही सूत्र भेटले ते पण एकाच धर्माचे का भेटतात? मग चोऱ्यामाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करताना विचार करावा ना!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App