विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्याबरोबरचा फोटो समोर आला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे.निलेश राणे यांनी म्हटले आहे की, दाऊद जेवढा पाकिस्तानमध्ये सक्रिय नसेल, त्यापेक्षा अधिक महाविकास आघाडीत सक्रिय दिसतोय.Nilesh Rane tweeted a photo of Mumbai Mayor Kishori Pednekar with Dawood’s niece
हा फोटो शिवसेना सदस्यता अभियान मागपाडा शाखा क्रमांक 213 येथील असल्याचे फोटोतील डिजिटल बॅनरवरुन दिसून येते. देशमुखांचा राजीनामा घेतला, मग मलिकांचा का नाही? मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा राजीनामा लगेच घेतला,
मग नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप का घेतला नाही. दाऊदसारख्या देशाचा दुश्मन असलेल्या व्यक्तीच्या माणसांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली आहे.
नवाब मलिक हे पवार कुटुंबीयांसाठी काही स्पेशल आहेत का, नवाब मलिक शरद पवारांबद्दल काही बोलेन, अशी भिती तर नाही ना? अशी संशयांस्पद शंकाही निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App