एक व्यक्तीने तीन चोरांचे सरकार हलवले, महाविकास आघाडीची वाट लावली; निलेश राणेंचा हल्लाबोल 


प्रतिनिधी

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या रविवारी कोल्हापूर येथे रेल्वेने निघाले मात्र त्यांना पोलिसांनी कोल्हापूरला पोहचू दिले नाही. त्यांना कराड येथे शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे. ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणखी घोटाळा उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटल्याने खळबळ उडाली. Nilesh Rane targets Thackeray – Pawar government over Kirit Somaya issue

त्यावर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी एका व्यक्तीने तीन चोरांचे सरकार हलवून टाकले आहे, असा शब्दांत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर दोन दिवसांनी आपण पुन्हा कोल्ह्यापुरला येणार आहे, असे सोमय्या म्हणाले.


कराड स्थानकावरच किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात; कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश


किरीट सोमय्याजी यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. किरीटजी आपण लढत असेच राहावे…

पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडला थांबवले, ९ वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Nilesh Rane targets Thackeray – Pawar government over Kirit Somaya issue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण