औरंगाबाद ते पुणे नवा द्रुतगती महामार्ग; प्रवास अवघ्या सव्वा तासात : गडकरी


वृत्तसंस्था

औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या सव्वा तासात प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. New expressway from Aurangabad to Pune; Travel in just one hour 15 minutes: Gadkari

बीड बायपास येथे ‘एनएचएआय’ अंतर्गत औरंगाबाद ते पैठणसह २,२५३ कोटी रुपयांच्या चार •महामार्गाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. दहा हजार कोटींचा हा महामार्ग आहे. लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे.



औरंगाबाद ते पुणे हे २२५ किमी अंतर सव्वा तासात पूर्ण करता येईल, असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी बीड ते अहमदनगर पैठणमार्गे अलायमेट अंतिम झाले आहे. १४० किमी प्रती तास वेगाने वाहने धावतील. साखर कारखान्यातून इथेनॉल निर्मिती वाढत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करण्यासाठी उत्पादकांना भेटण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचीही यावेळी भाषणे झाली.

New expressway from Aurangabad to Pune; Travel in just one hour 15 minutes: Gadkari

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात