विशेष प्रतिनिधी
जळगाव : पन्नास रुपयांच्या उधारीवरून काका आणि पुतण्याचं भांडण झाले. या भांडणात पुतण्याने मारहाण केल्यामुळं काकाचा जीव गेला. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या कंडारी गावात घडली आहे. nephew took uncle’s life to borrow fifty rupees; Incident in Dharangaon in Jalgaon district
भारत सुकडू भिल असे काकाचं नाव आहे. या घटनेत नेमकं झालं असं की सोमवारी रात्री भारत आणि त्यांचा पुतण्या राजू मानसिंग भिल यांच्यात ५० रुपयांच्या उधारीवरून कडाक्याचं भांडण झाले. भांडणात राजूनं मारहाण करताना भारत यांना जोरात धक्का दिल्यानं ते गटारीत पडले. त्यात डोक्याला मार लागल्यानं मोठा रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अखेर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपी राजू विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App