राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी!!

प्रतिनिधी

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पडली आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांनी त्या संदर्भात वेगळा सूर काढला आहे.NCP’s claim, a spark of disagreement in the Mahavikas Aghadi over the post of Chief Minister!!

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली यश मिळाले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आता नंबर एकचा पक्ष होणार असल्याने पक्षाचाच मुख्यमंत्री होईल हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे, असा दावा जयंत पाटलांनी कराड मधल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला.



मात्र त्या मुद्द्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळा सूर काढला आहे. महाविकास आघाडी निवडणुकीत जिंकून सत्तेवर येऊ द्या. मग महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री ठरविला जाईल. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय महाविकास आघाडीचाच होता. तसा निर्णय घेता येऊ शकेल, असे संजय राऊत म्हणाले, तर ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. पण सध्या या मुद्द्यावर काँग्रेसला काहीही बोलायचे नाही, असे सांगून नाना पटोले यांनी जयंत पाटलांच्या दाव्याला छेद दिला आहे.

अजित पवारांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा बोलून दाखवली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरू शकतील, असे वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादीतच मुख्यमंत्रीपदाचे दोन स्पर्धक झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतात संजय राऊत आणि नाना पटोले यांनी वेगळा सूर काढत राष्ट्रवादीच्या दाव्याला काटशह दिला आहे, पण यामुळेच मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

NCP’s claim, a spark of disagreement in the Mahavikas Aghadi over the post of Chief Minister!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात