Ncp State President Jayant Patil : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने शासनाने प्रभाग रचनेचा निर्णयही घेतला. या प्रभाग रचनेवरून बरेच वादही समोर आले आहेत. अनेक पक्षांनी याला आक्षेप नोंदवला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला सत्ताधारी सहकारी पक्षांतूनही आक्षेप असल्याचे दिसून आले. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. अहमदनगरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Ncp State President Jayant Patil Warned Shivsena Congress on Local Body Elections
प्रतिनिधी
अहमदनगर : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने शासनाने प्रभाग रचनेचा निर्णयही घेतला. या प्रभाग रचनेवरून बरेच वादही समोर आले आहेत. अनेक पक्षांनी याला आक्षेप नोंदवला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला सत्ताधारी सहकारी पक्षांतूनही आक्षेप असल्याचे दिसून आले. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. अहमदनगरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जयंत पाटील म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झाला. आम्ही सर्वजण या सरकारचे घटक असल्यानं तो निर्णय होण्यात आमचाही वाटा आहेच. त्यामुळं आता ठरलेली प्रभाग रचना सर्वांनाच बंधनकारक ठरते,”
प्रभाग रचनेबद्दल निर्णय होऊनही काँग्रेसने वेगळी मागणी केल्याबद्दल प्रश्न विचारल्यावर पाटील म्हणाले, “प्रभाग रचना बदलण्यासंबंधी जेव्हा चर्चा सुरू होती, त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण चार सदस्यांचा प्रभाग हवा अशी भूमिका मांडत होते. तर काँग्रेसची दोन सदस्यांची मागणी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचेही मत दोन सदस्यीय रचना असावी असं होतं. मात्र, त्यावर चर्चा होऊन नंतर तोडगा काढण्यात आला. मंत्रिमंडळानं यासंबंधी निर्णय घेतला. त्यामुळं तो सर्वांनाच बंधनकारक ठरतो. या निर्णयाचे आम्ही सर्वजणच धनी आहोत. त्यामुळं आता यावर वेगळी चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यासोबतच हा निर्णय झाला म्हणून महाविकास आघाडीतील कोणाला दोषही देता येणार नाही,” असंही ते म्हणाले.
निवडणुकांत आघाडी होणार का या मुद्द्यावर जयंत पाटील म्हणाले की, “निवडणुका अजून लांब आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही. पण, निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. आपापल्या पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नेते आपली मतं व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा नेत्यांना बोलावं लागतं. मात्र, हे काही अंतिम ठरू शकत नाही. आमची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आघाडी होण्यास प्राधान्य देण्याची भूमिका आहे. तसा आमचा प्रयत्नही राहील. मात्र, इतरांकडून वेगळा आग्रह सुरूच राहिला, तर आमचाही नाइलाज होईल. त्यानंतरही आम्ही स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. ते निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच व्हावेत हेही पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर सुरू असलेल्या केंद्रीय एजन्सीजच्या कारवाईवर भाष्य केले. ते म्हणाले की, भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या यंत्रणांचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार? असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजूला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपामध्ये गेले आहेत त्यांचं काय झालं हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
पाटील पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमिनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही, असे अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसे स्पष्ट केले आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.
Ncp State President Jayant Patil Warned Shivsena Congress on Local Body Elections
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App