NCP Leader Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करून म्हटले की, यावेळी मी एनसीबीचे आणखी चुकीचे काम उघड करीन. मात्र, यावेळी ते पत्रकार परिषदेद्वारे नव्हे तर आपल्या ट्विटर हँडलवर खुलासा करणार आहे. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत एनसीबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. NCP Leader Nawab Malik Criticizes NCB Sameer Wankhede Ask About Fletcher Patel
प्रतिनिधी
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करून म्हटले की, यावेळी मी एनसीबीचे आणखी चुकीचे काम उघड करीन. मात्र, यावेळी ते पत्रकार परिषदेद्वारे नव्हे तर आपल्या ट्विटर हँडलवर खुलासा करणार आहे. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत एनसीबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल या पंचबाबत सवाल उपस्थित केले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा फ्लेचर पटेलशी काय संबंध काय आहे? तीन केसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्याचे कारण काय? – @nawabmalikncp pic.twitter.com/mil44astZl — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 16, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल या पंचबाबत सवाल उपस्थित केले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा फ्लेचर पटेलशी काय संबंध काय आहे? तीन केसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्याचे कारण काय? – @nawabmalikncp pic.twitter.com/mil44astZl
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 16, 2021
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर बेतलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले आहे की, फ्लेचर पटेल कोण आहेत? तो NCB आणि त्याच्या एका अधिकाऱ्याशी कसा संबंधित आहे? या फोटोत फ्लेचर पटेल कोणासोबत दिसत आहे, ज्यांना तो ‘माय लेडी डॉन’ म्हणतो. कोण आहे ही ‘लेडी डॉन’?
Here are the front pages of 3 Panchnamas where Fletcher Patel is a Panch. pic.twitter.com/NOMv5mv1CB — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
Here are the front pages of 3 Panchnamas where Fletcher Patel is a Panch. pic.twitter.com/NOMv5mv1CB
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
तत्पूर्वी, बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात भाजप कार्यकर्ते मनीष भानुशाली आणि केपी गोस्वामी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी क्रूझवर पडलेल्या छाप्याला बनावटही म्हटले होते.
Fletcher Patel seen in this picture with someone who he calls 'My Lady Don'.Who is this 'Lady Don' ? pic.twitter.com/epTRSopDcH — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021
Fletcher Patel seen in this picture with someone who he calls 'My Lady Don'.Who is this 'Lady Don' ? pic.twitter.com/epTRSopDcH
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, एनसीबीने त्यांच्या जावयाला गोवले आहे. त्याचप्रमाणे, आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आले आहे. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या ड्रग्ज चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही NCB ने अटक केली होती. समीर खान यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला. परंतु आता एनसीबीने त्यांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
NCP Leader Nawab Malik Criticizes NCB Sameer Wankhede Ask About Fletcher Patel
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App