राष्ट्रवादी कॉँग्रेस उतरली खासदार अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थ, नथुराम गोडसेंच्या भूमिकेला विरोध नसल्याचे केले स्पष्ट

व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका होऊ लागल्यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ उतरली आहे. कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसे भूमिकेला आमचा विरोध नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. NCP has come out in support of MP Amol Kolhe, making it clear that it is not opposed to Nathuram Godse’s role


विशेष प्रतिनिधी

मुंबई : व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका होऊ लागल्यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ उतरली आहे. कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसे भूमिकेला आमचा विरोध नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही. अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संशय नाही. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर, अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे.



कोल्हे यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाºया गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, यावरून कोल्हे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका करण्याला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांनी जरी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असली, तरी त्यात गोडसेचे समर्थन आलेच. गोडसेंच्या कृतीचे, गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. माझा अमोल कोल्हेंच्या गोडसेची भूमिका साकारण्याला विरोध आहे,असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना विरोध केला आहे.

NCP has come out in support of MP Amol Kolhe, making it clear that it is not opposed to Nathuram Godse’s role

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात