
उद्धव ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. आज मातोश्रीतून त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले आणि विधिमंडळातली आपली कारकीर्दही संपुष्टात आणली. पण हे कसे घडले? आणि का घडले?, याची मीमांसा करताना अनेक विश्लेषक त्यांच्या इमोशनल व्यक्तिमत्त्वाचे विच्छेदन करताना दिसत आहेत.NCP and sharad Pawar brought down Uddhav Thackeray government in real terms
मुख्यमंत्रिपद वेगळे आणि पक्षप्रमुख पद वेगळे वगैरे उपदेशाचे डोस उद्धव ठाकरेंना पाजले जात आहेत. जणू काही उद्धव ठाकरे या विश्लेषकांच्या सल्ल्यासाठी आता रिकामेच झाले आहेत!! पण उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजीनाम्यामागे फक्त इमोशनल कारणे नाहीत, तर सर्वाधिक करणे ही व्यावहारिक आहेत. आणि ती जास्त टोचणारी आहेत!!
उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणातून शिवसैनिक कदाचित चिडतील, तडफडतील. ते स्वाभाविक आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी शिवसेना संघटनेकडे आणि आमदारांकडे केलेले दुर्लक्ष विसरता येणार नाही. सैन्य पोटावर चालते आणि पक्ष निधीवर चालतो आणि हा निधी गेल्या अडीच वर्षात या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खेचून घेतला हे वास्तव उद्धव ठाकरे जरी विसरले तरी शिवसेनेचे आमदार विसरू शकले नाहीत. हे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचे खरे इंगित आहे!!
उद्धव ठाकरेंनी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. मुंबईत त्यावेळी झालेल्या पावसाबरोबर शिवसैनिकांच्या डोळ्यातले इमोशनल पाणी देखील वाहिले होते!! मराठी प्रसार माध्यमांनी त्यातल्या पाण्याचा प्रत्येक थेंब टिपला!! पण “वर्षा” या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बंगल्यातून बॅगा भरभरून कशा “मातोश्री” कडे गेल्या ते सोशल मीडियावर दिसले होते.
– फेसबुक लाईव्ह मधून साधले काय??
पण प्रश्न त्यापुढचा आहे. मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांच्या फेसबुक लाईव्ह सगळे इमोशनल भाषण करून नेमके काय साध्य केले??, हा आहे. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह इमोशनल भाषण केल्यानंतर तेव्हा अवघ्या अर्धा तासात एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून परखड प्रत्युत्तर देऊन टाकले. ते सगळे वास्तववादी आणि व्यावहारिक मुद्दे होते. अनैसर्गिक युती तोडा महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त घटक पक्षांचा फायदा झाला आणि शिवसैनिक भरडला हे मुद्दे एकनाथ शिंदे यांनी मांडल्याने मुख्यमंत्र्यांचा फेसबुक लाईव्हचा सगळा इमोशनल ड्रामा फेल गेला!!
– महापालिका इच्छुकांनी जमवलेली गर्दी
इतकेच नाही तर काही माध्यमांनी मुंबईच्या “वर्षा” ते “मातोश्री” या रस्त्यावर जमलेल्या सगळ्यात गर्दीचे वर्णन काही प्रसार माध्यमांनी महापालिका निवडणुकांमधील इच्छुकांनी जमवलेली गर्दी असे केले होते. म्हणजे पुन्हा सर्वसामान्य शिवसैनिकापेक्षा नगरसेवकपदाच्या इच्छुकांनी जमवलेली गर्दी असे लेबल त्या इमोशनल ड्रामाला लागले होते.
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा हा सगळा इमोशनल ड्रामा ते एकनाथ शिंदे गटाचे थेट व्यावहारिक प्रत्युत्तर यांची सांगड कशी घालायची?? याचा नेमका अर्थ काय??
– कुर्हाडीचे खरे दांडे कोण??
भले मुख्यमंत्री “कुर्हाडीचा दांडा गोतास काळ”, असे त्यावेळी फेसबुक लाइव्ह मध्ये म्हटले होते. आजच्या राजीनाम्याच्या भाषणात पण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर खापर फोडले आहे. पण ज्या कुऱ्हाडीने गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेच्या फांद्या तुटल्या, अख्खा विधिमंडळ पक्ष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेला त्या “कुऱ्हाडी” वर्षा बंगल्यावर फेसबुक लाईव्ह नंतर येऊन मुख्यमंत्र्यांना भेटून गेल्या होत्या. त्या “कुऱ्हाडी” आणि त्याचे “दांडे” मुख्यमंत्र्यांना ओळखता आले नाहीत का?? आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी व शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार मानले आणि आपल्याच शिवसैनिक आमदारांना मात्र दूर लोटले ही वस्तुस्थिती खुद्द त्यांच्या लक्षात आली नाही का??
– निधी वाटपातली तफावत दिसली नाही??
मुख्यमंत्री म्हणाले, मी जबाबदारी झटकत नाही. जबाबदारी आली ती जिद्दीने पार पाडतो. पण हेच मुख्यमंत्री एक गोष्ट कसे काय विसरले की सैन्य पोटावर चालते आणि पक्ष निधीवर चालतो!!, हे त्यांच्या गेल्या 2.5 वर्षात लक्षात कसे आले नाही?? गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेला 16 % आमदार निधी, काँग्रेसला 34 % आमदार निधी आणि राष्ट्रवादीला 57 % आमदार निधी आकडेवारीतली ही तफावत “जिद्दी” मुख्यमंत्र्यांच्या लक्षात कशी नाही आली?? की लक्षात येऊनही ते काही करू शकले नाहीत??
– पालघर साधूंचे हत्याकांड कसे विसरू??
मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व या मुद्द्यावर कितीही लंबेचौडे भाषण ठोकले तरी पालघर मध्ये झालेले साधूंचे हत्याकांड विसरता येईल का?? मुख्यमंत्री इमोशनल ड्रामा करून खूप बोलले पण गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेसाठी व्यावहारिक पातळीवर काय केले?? हा सगळ्यात कळीचा मुद्दा ते पूर्णपणे विसरले!! याचीच आठवण एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रत्युत्तरातून करून दिली होती. आजच्या राजीनाम्याच्या भाषणातही उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या मुद्द्यांवर चकार शब्दानेही बोलले नाहीत.
– बॅगांमध्ये काय भरले होते??
“वर्षा” बंगल्यावरून बॅगा भरभरून “मातोश्री’वर गेल्या. त्याची देखील खिल्ली सोशल मीडियावर अनेकांनी उडवली होती. हे मुख्यमंत्र्यांचे साधे खासगी सामान आहे की त्या बॅगा भरभरून नोटा “मातोश्री”वर गेल्या??, अशा खोचक टिप्पण्या अनेकांनी केल्या होत्या. त्या टिपण्यांकडे सोशल मीडियावरच्या म्हणून दुर्लक्ष केले तरी मूळ एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेले मुद्दा विसरता कसा येतील??
एकनाथ शिंदे पवारांच्या जाळ्यात नाही फसले
शिवाय एकनाथ शिंदे यांनी आधीच एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या प्रत्युत्तरामधून अधोरेखित केली होती. ना ते मुख्यमंत्र्यांच्या इमोशनल ड्रामाला फसले, ना त्यांनी मुख्यमंत्र्यांची अपरोक्षपणे आलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारली. ही ऑफर एकनाथ शिंदेंना द्या अशी सूचना शरद पवार यांनी केल्याच्या बातम्या आल्या. या बातम्या एकनाथ शिंदे पर्यंत पोहोचल्या नव्हत्या का?? अर्थातच त्या पोहोचल्या आणि म्हणूनच जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या इमोशनल ड्रामा मध्ये अडकले नाहीत तसेच ते पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरच्या जाळ्यात देखील फसले नाहीत. ही वस्तुस्थिती त्यांच्या 4 ट्विट मधून दिसून येते होती.
– भावना – व्यवहाराची सांगड नको का??
शेवटी एक बाब निश्चित शिवसेना नावाचा पक्ष कितीही भावनिक आधारावर वर्षानुवर्षे चालला असला तरी व्यवहार विसरला तर तो रसातळाला जातो हेच उद्धव ठाकरे यांनी इमोशनल ड्रामातून सिद्ध केले. सैन्य पोटावर चालते आणि पक्ष निधीवर चालतो हीच आजची वस्तुस्थिती आहे!! अडीच वर्षे शरद पवारांच्या सहवासात राहून “जिद्दी” उद्धव ठाकरे यांच्या एवढे लक्षात येऊ नये??
NCP and sharad Pawar brought down Uddhav Thackeray government in real terms
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत चार मजली इमारत कोसळली : 18 ठार, 15 जणांना वाचवलं, ढिगाऱ्याखाली आणखी अडकल्याची भीती
- 30 वर्षीय आकाश अंबानी करणार जिओचे नेतृत्व : 65 वर्षीय मुकेश यांचा संचालकपदाचा राजीनामा, रिलायन्समध्ये ठरला उत्तराधिकारी
- ADR Election Watch Report : राज्यसभेतील 31 टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी खटले, 87 टक्के कोट्यधीश, वाचा सविस्तर…
- राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे – पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!!