प्रतिनिधी
पुणे / नाशिक : भारतीय संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हानी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर कुरुलकर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – ज्ञानप्रबोधिनी यांच्या कनेक्शनची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने घडवली. त्याचबरोबर राष्ट्रवादीने आज पुण्यात मोठे आंदोलन देखील केले. पण आता याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र नाशिकमधून वेगळा सूर लावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणीही देशद्रोहाचा आरोप ठेवू शकत नाही, अशा शब्दांत भुजबळांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या नेत्यांना सुनावले आहे.NCP agitation in Pune against Sangh in Kurulkar honey trap case; But Bhujbal’s tune is different from Nashak!!
प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी एजंटच्या हनी ट्रॅप मध्ये अडकले. त्यांनी परदेशात जाऊन भारतातल्या काही प्रकल्पांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला दिली. त्यामुळे राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशी आणि तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
या पार्श्वभूमीवर प्रदीप कुरुलकर यांचे शिक्षण या ज्ञानप्रबोधिनी संस्थेत झाले आहे. त्याचे कनेक्शन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 19 या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातले नेते रत्नाकर महाजन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर काही मजकूर लिहिला. त्यावर सोशल मीडिया जोरदार चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यात कुरुलकर – संघ कनेक्शनच्या मुद्द्यावर आंदोलन केले.
मात्र नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी या संदर्भात वेगळा सूर लावून हनी ट्रॅप मध्ये कोणीही अडकू शकतो. एखादी व्यक्ती अडकली, तर त्याच्याशी संबंधित संस्थेला त्यामुळे बदनाम करता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणी देशद्रोहाचा ठपका ठेवू शकणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर लक्ष ठेवण्याचे काम सुरक्षा यंत्रणांचे असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही लक्ष ठेवावे. पण ती जबाबदारी नाही, असे छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App