विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नुकताच बेल मंजूर झाली आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी रत्नागिरीतील दापोली येथे पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी चा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केला जातोय असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
NCB used to harass, defame and imprison citizens – Jayant Patil
जयंत पाटील पुढे म्हणतात, शाहरूखच्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ते इतर कुणाबाबतही घडू नये असे वाटते. ह्या गोष्टी इतर बऱ्याच लोकांसोबत घडल्याही असतील. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. अशी त्यांनी मागणी केली आहे.
नवाबभाई सत्य मांडत आहेत, केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना छळण्यासाठी सुरू, जयंत पाटलांचा आरोप
समीर वानखेडे यांचे लग्न ज्यांनी लावून दिले आहे, त्या व्यक्तींनी ह्या परिस्थितीतील सत्य सर्वांसमोर आणले आहे. चुकीची माहिती देऊन केंद्र सरकारच्या सेवेत जर कोणी रुजू होत असेल, तर त्याची चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
कुणी सांगितलं शाहरुख खानच्या मुलाला क्रूझवर पकडण्यात आले? जर शाहरुखच्या मुलाला क्रूजवर जाण्याआधीच पकडले असेल तर? तर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. एकूणच यंत्रणा कशी चुकीची आहे, दिशाभूल करतात हे सांगण्याचा नवाब मलिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे सत्य आहे ते अतिशय गंभीर आहे. नवाब मलिक हे एनसीबीई च्या विरोधात पुराव्यांनिशी बोलत आहेत. असे देखील जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App