“NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करण राहील लांब , ठाकरे सरकार त्यांना ठरवतय दोषी” ; प्रवीण दरेकर यांचा ठाकरे सरकारवर निशाणा


शिवसेना नेते आर्यन खानच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, हे दुर्दैवी आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.”NCB officials will be praised for a long time, Thackeray government blames them”; Praveen Darekar targets Thackeray government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबई क्रूझ ड्र्ग्ज केस प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत मोठे गौप्यस्फोट केले होते.

तर दुसरीकडे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यनला जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.



NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणे दूर राहिले. राज्य सरकार त्यांना दोषी ठरवत आहे. हेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही सुरू आहे. शिवसेना नेते आर्यन खानच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, हे दुर्दैवी आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे कौतुक करायचे लांब राहिले, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

एकीकडे युवा पिढी अमली पदार्थाच्या व्यसनाकडे जात असताना ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचे असते. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक दूर राहिले. याउलट एनसीबी यंत्रणा आणि त्यांचे अधिकारी कसे दोषी आहेत, अशा संशयाच्या भोवऱ्यात त्यांना उभे करायचे, हे तपास यंत्रणा म्हणून योग्य नाही, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे.

“NCB officials will be praised for a long time, Thackeray government blames them”; Praveen Darekar targets Thackeray government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात