नवाब मालिक यांना आज जे. जे. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज; पुन्हा ईडी कोठडीत!!

वृत्तसंस्था

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्यासमवेत जमीन खरेदी गैरव्यवहारात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना आज मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. Nawab Malik today J. J. Discharge from hospital; ED in the cell again !!



नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केल्यानंतर त्यांना पीएएमएल कोर्टाने कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु त्यांना ईडीच्या कोठडीत पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बरी आहे, अशी माहिती नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान यांनी दिली आहे.

त्यानंतर आज नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नवाब मलिक यांची ईडीची कोठडीची मुदत 3 मार्च पर्यंत आहे. त्यामुळे मलिक यांची जे. जे. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रवानगी ईडीच्या कोठडीत होणार आहे.

Nawab Malik today J. J. Discharge from hospital; ED in the cell again !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात