वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टाने आज ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.Nawab Malik: Nawab Malik Arthur Road Jail Nationalist activists’ announcement, Nawab Bhai, go ahead, we are with you
परंतु, आज नवाब भाईंच्या आर्थर रोड जेल वारीच्या निमित्ताने एक अजब गोष्ट घडून आली. नवाब मलिक यांना कोर्टातून थेट आर्थर रोड जेलमध्ये पोलिसांनी नेले तेव्हा नवाब मलिक यांचे समर्थक ताडदेव जवळच्या आर्थर रोड जेल समोर जमले होते. नवाब मलिक ईडी अधिकाऱ्यांच्या गाडीतून उतरून प्रत्यक्ष आर्थर रोड जेलमध्ये जाताना राष्ट्रवादीच्या या मलिक समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“नवाब भाई, आगे बढो हम तुम्हारे साथ है!!” राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपण नेमक्या कोणत्या घोषणा कोणत्या वेळी करतोय हे कळले तरी काय…?? नवाब मलिक कोठडीतून आर्थर रोड जेलमध्ये चालले असताना त्यांच्याबरोबर साथ है…!!…म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर जेलमध्ये जायचे आहे काय…!!??, असा सवाल आता सोशल मीडियातून करण्यात येत आहे. अनेकांनी या संदर्भात मीम्स तयार केली असून राष्ट्रवादीच्या मलिक समर्थकांची जागा आर्थर रोड जेलमध्ये आहे, असे देखील टोचून घेतले आहे.
https://twitter.com/ANI/status/1500805750557675522?s=20&t=a2UrEyCd-sOEtVdLHYsaTA
एरवी सर्वसामान्यपणे कोणत्याही नेत्याच्या नावाने आगे बढोच्या घोषणा आपल्याला त्या नेत्याचा सत्कार अथवा जाहीर सभेचे भाषण किंवा निवडणूक अशा वेळी त्या घोषणा ऐकू येतात. नवाब मलिक यांच्या बाबतीत मात्र अजब प्रकार घडून ते आर्थर रोड जेलमध्ये चालले असताना नवाब भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है!! अशा घोषणा राष्ट्रवादीतील त्यांच्या समर्थकांनी दिल्याने तो राज्यभरात खिल्ली उडवण्याचा विषय बनला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App