प्रतिनिधी
मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यासोबत कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही. त्यांना हीन वागणूक दिली नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे चहा पीत असल्याचे दिसत आहे.Navneet Rana is not treated badly; Valse Patal’s explanation
खासदार नवनीत राणा यांनी जेलमध्ये आपल्यासोबत हीन वागणूक केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. त्यावर वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पाटील म्हणाले की, आतापर्यंतची कारवाई ही कायद्यानुसारच करण्यात आली आहे. राणांना कोठडीत हीन वागणूक दिल्याचा प्रकार घडलाच नाही. लोकसभेच्या सचिवांना राज्य सरकार अहवाल पाठवणार आहे, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीचा निर्णय हा दोन दिवसात होणार आहे. औरंगाबादचे आयुक्त याबाबत निर्णय घेतील. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करणार असल्याचेही पाटील म्हणाले.
नवनीत राणांचे आरोप
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला होता. या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल 24 तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App