वृत्तसंस्था
मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणात ठाकरे – पवार सरकारची असंवेदनशीलता संतापजनक आहे. ऐन गणेशोत्सवात भर रस्त्यावर बलात्कार होतो. या सरकारच्या पोलीसांची मोकाट आरोपींना भीतीही वाटत नाही. महाराष्ट्रात गेली दोन वर्षे या सरकारने महिला आयोगच नेमलेला नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय महिला आयोगाने ठाकरे – पवार सरकारवर ताशेरे झोडले आहेत. National Commission for Women targets thackeray – pawar govt over sakinaka rape case
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सदस्यांनी ठाकरे – पवार सरकारवर संताप व्यक्त केला. पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली आहे. पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितले.
ही अतिशय दुर्देवी घटना आहे. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी मोकाट आहेत. आरोपींना सरकारची भीती वाटत नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडताहेत. पण सरकार ढिम्म आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत, असा आरोप महिला आयोगाच्या सदस्यांनी केला आहे.
संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूकच करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. ठाकरे – पवार सरकार इतके असंवेदनशील कसे राहू शकते की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असते तर महिलांना न्याय तरी मिळाला असता, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App