Nashik Musomint : नाशिकमध्ये 30 एप्रिलला तरुण कलाकारांची नाट्यसंगीत मैफल!!


प्रतिनिधी

नाशिक : नाशिक मधील तरुण कलाकारांच्या “म्यूझोमिन्ट” तर्फे 30 एप्रिल रोजी “नमन नटवरा” ह्या नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमधील प्रसिद्ध गायक आशिष रानडेंच्या सुमधुर गायकीचा आस्वाद घेण्याची संधी नाशिककरांना या निमित्ताने मिळणार आहे.Nashik Musomint: Drama concert of young artists on 30th April in Nashik



या मैफिलीत मुंबई येथील तरुण तबला वादक तनय रेगे आणि नाशिकचे युवा संवादिनी वादक समृद्ध वावीकर साथ करतील. पखवाज साथ दिगंबर सोनवणे आणि मैफिलीचे निवेदन रेडिओ विश्वासच्या बागेश्री पारनेरकर करतील.
३० एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास सभागृहात ही मैफल रंगणार आहे. महाराष्ट्रातील समृद्ध नाट्यसंगीत परंपरेची अनुभूती घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन “म्यूझोमिन्ट”ने केले आहे.

Nashik Musomint: Drama concert of young artists on 30th April in Nashik

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”