वृत्तसंस्था
रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीसांनी कोणतीही ऑर्डर हातात नसताना अटक केली. नारायण राणे हे संगमेश्वरमध्ये गेस्ट हाऊसवर जेवत असताना भरल्या ताटावरून त्यांना उठवून पोलीसांनी त्यांना अटक केली म्हणून नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे हे पोलीसांवर प्रचंड संतापले. Narayan Rane’s Chiranjeev Nilesh Rane lashed out at the police; Police made the arrest without an order
त्यांनी पोलीसांना आधी ऑर्डर दाखवा. साहेब जेवत आहेत. हात नाही लावायचा, असे निलेश राणे पोलीसांवर ओऱडत असल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. स्वतः निलेश राणे आणि त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या भोवती कडे केले असल्याचे तसेच नारायण राणे यांच्या हातात जेवणाचे ताट आहे, हे देखील या विडिओत दिसत आहे.
https://youtu.be/ZmVYzK2BN9Y
https://twitter.com/ANI/status/1430127979997188107?s=20
तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असे आम्ही पोलिसांना सांगितले. त्यांचे जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होते, त्यांचा ECG करायचा होता, त्यांना काहीही करू दिले नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचले, असे म्हणत प्रसाद लाड यांनी ठाकरे – पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी अजूनही अटकेची कागदपत्रे दाखवलेली नाहीत. राणे साहेबांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केला आहे.
एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून एका केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. रत्नागिरी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. यातून तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App