निर्मोह निर्वैर अकाल मूरत! ५० वर्षात मिळालेलं सोनं रूग्णालयं-मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी दान ; नांदेड़ गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहिबची घोषणा


शिखांच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक नांदेडचा गुरूद्वारा!


देशभरातील गुरुद्वारा व्यवस्थापन समित्यांनी कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी बेड-ऑक्सिजन भोजन व्यवस्था केली आहे. 


दिल्ली-मुंबई, मुंबई, पंजाब आणि इतर बर्‍याच राज्यांत, गुरुद्वारा प्रतिष्ठान समित्यांनी सर्वतोपरी मदतकार्य केले आहे .


ही एक जबरदस्त चपराक आहे मंदिर-गुरूद्वारा इ.ठिकाणी दान करू नका म्हणनार्यांसाठी .Nanded’s Gurudwara Takht Shri Hazoor Sahib to Use All Its Gold Reserves to Build Hospitals, Healthcare Facilities


विशेष प्रतिनिधी

नांदेड़ : सर्वत्र सध्या गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहिब नांदेड़ची चर्चा आहे .गुरुद्वारा तख्त श्री हजुर साहिब यांनी जाहीर केले आहे की गेल्या पाच दशकांत गुरूद्वार्यास प्राप्त झालेले सर्व सोने वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी दान केले जाईल. या दान केलेल्या सोन्यामधून रुग्णालयांना आवश्यक वैद्यकीय पुरवठा केला जाईल .तसेच रूग्णालयं-मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी देखील याचा वापर केला जाणार आहे . तख्त श्री हजूर साहिब नांदेड़ या गुरूद्वाऱ्याने हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. शिखांच्या पाच पवित्र तख्तांपैकी हा एक गुरूद्वारा आहे.तख्त जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंग यांनी ह्या उपक्रमाची घोषणा केली आहे.

अलीकडेच, देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बर्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळीसुद्धा सर्व गुरुद्वारा व्यवस्थापन समित्यांनी पुढे येत विनामूल्य ऑक्सिजनची व्यवस्था केली.

तख्त जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंग म्हणाले की,कोरोना काळात लोकांना उपचार आणि रूग्णसेवांची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात जे सोनं जमा झालं आहे त्यातून आम्ही आता रूग्णालयं आणि मेडिकल कॉलेजेस उभारणार आहोत. आजवर या गुरूद्वाऱ्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असेललं आपलं ऋण लक्षात घेऊन आम्ही हा महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत.

कोरोना काळात देशभरातल्या गुरूद्वाऱ्यांनी आणि गुरूद्वारा प्रबंधन समितींनी लोकांच्या जेवणापासून ते बेड, ऑक्सिजनपर्यंत अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे. २३ मे रोजी रूपनगर या ठिकाणी एक कोव्हिड सेंटर सुरू केलं जाणार आहे. यासाठीही शिख समुदायाने पुढाकार घेतला आहे.

दिल्ली – कोरोना रूग्णांसाठी लंगर

लॉकडाऊन आणि कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरूद्वारा बंगला साहिब कडून लंगरची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. कोरोना पीडित परिवार, कोरोना रूग्ण या सगळ्यांना लंगरद्वारे जेवण पुरवलं जातं आहे. जे स्वतः घरी जेवण तयार करू शकत नाहीत त्यांच्या घरी डबेही पुरवले जात आहेत.

Nanded’s Gurudwara Takht Shri Hazoor Sahib to Use All Its Gold Reserves to Build Hospitals, Healthcare Facilities

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती