Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरव !


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे सर्वत्र ओळखले जातात. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यांची संवादफेक, देहबोली, हावभाव हे साऱं चाहत्यांच्या मनाला थेट भिडते. त्यांच्या याच अभिनयामुळे नानांचा नुकताच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीनं सन्मान करण्यात आला. Nana Patekar: Veteran actor Nana Patekar honored with Dinanath Mangeshkar Award!

त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्यामध्ये धडाडीनं काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यावेळी गौरवण्यात आले.दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा (Pyarelal Sharma) यांना प्रदान करण्यात आला. तसेच संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्काराने उषा मंगेशकर यांना सन्मानित करण्यात आले. यासोबत मीना मंगेशकर यांना आणि सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी प्रेम चोप्रा यांनासुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे खासदार आणि संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनासुद्धा यावेळी सन्मानित करण्यात आले.

साहित्य क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या संतोष आनंद (Santosh Anand) यांना वाग्विलासिनी पुरस्कार (Wagvilasini Award) प्रदान करण्यात आला.

यासोबत कवयित्री नीरजा , डॉ. प्रतीत समदानी , डॉ. राजीव शर्मा , डॉ. जनार्दन निंबोळकर , डॉ. अश्विन मेहता, यांनासुद्धा यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी मोठी आहे.त्यांचे काम नेहमीच संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

Nana Patekar : Veteran actor Nana Patekar honored with Dinanath Mangeshkar Award!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण