Nagar Panchayat Results: न.पं. निवडणुकीत 419 जागा जिंकून भाजप नंबर १, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती जागा


महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी राज्यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिला क्रमांक कायम राखला आहे. पक्षाने पंचायत निवडणुकीत एकूण 1,791 जागांपैकी 419 जागा जिंकल्या आहेत. Nagar Panchayat Results BJP become No 1 won 419 seats in the election, find out which party has how many seats


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी राज्यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिला क्रमांक कायम राखला आहे. पक्षाने पंचायत निवडणुकीत एकूण 1,791 जागांपैकी 419 जागा जिंकल्या आहेत.

कोणत्या पक्षाकडे किती जागा

राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसला 381, तर काँग्रेसला 344 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना 296 जागांसह चौथ्या क्रमांकावर असून अपक्ष उमेदवारांनी 239 जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागा सीपीएम, बसपा आणि स्थानिक पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात एकाच वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल गुरुवारी जाहीर झाले.



भंडारा गोंदियात भाजपला 38

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील 105 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी भाजपला 38, काँग्रेसला 34 आणि राष्ट्रवादीला 21 जागा मिळाल्या आहेत. तसेच 210 पंचायत समिती जागांपैकी भाजपने 93, काँग्रेसला 53 आणि राष्ट्रवादीने 36 जागा जिंकल्या आहेत.

Nagar Panchayat Results BJP become No 1 won 419 seats in the election, find out which party has how many seats

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!