ठिणगीतून वणवा; पवारांबरोबर कोणीही नव्हते तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत आलो; संजय राऊत यांचे थेट प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या वक्तव्यांच्या ठिणग्यांमधून वणवा पेटायला सुरुवात झाली आहे. सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी काल साताऱ्यात केल्यानंतर आज संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. MVA on the brinks of collapse, Sanjay Raut gave befitting reply to sharad Pawar

कोण म्हणतं सामनाला महत्त्व द्या?, सामना गेल्या 40 वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर राजकीय भाष्य करत आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, पण असे असले तरी शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवारांबरोबर जेव्हा कोणीही नव्हतं किंवा आम्ही त्यांच्या सोबत आलो, याची जाणीव बाकीच्या नेत्यांनी ठेवावी. तुमच्याकडे काही असेल तर बोलायची हिंमत ठेवा, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांनी काल सातारच्या पत्रकार परिषदेत एकाच वेळी देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण या तिन्ही नेत्यांवर शरसंधान साधले होते. फडणवीस यांनी कालच त्यांना प्रत्युत्तर दिले. आज संजय राऊत यांनी त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपची बी टीम अशी संभावना केली होतीच, त्यामुळे आता महाविकास आघाडीतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या परस्परांविरोधी वक्तव्यातून निर्माण झालेल्या ठिणग्यांचे वणव्यात रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे.

नितीश कुमार उद्या मुंबईत

एकीकडे अशी महाविकास आघाडी महाराष्ट्रात अशी फुटत असताना दुसरीकडे उद्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट साधण्यासाठी मुंबईत येत आहेत आणि ते उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

MVA on the brinks of collapse, Sanjay Raut gave befitting reply to sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub