विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीच्या आज 17 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी होणाऱ्या महामोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेतला, तर एक बाब स्पष्ट होते आहे, ती म्हणजे संबंधित महामोर्चा हा महाविकास आघाडीचा आहे. अजेंडा राष्ट्रवादीचा आहे आणि गर्दी जमवण्याची जास्तीत जास्त जबाबदारी शिवसेनेवर टाकली आहे.
– सावरकरांच्या अपमानाचा विषय अजेंड्यावरही नाही
महाराष्ट्रात राज्यपालांनी आणि भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य केली, असा आरोप करून महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला आहे. पण महाराष्ट्रात येऊन राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला हा विषय आघाडीच्या महामोर्चाच्या अजेंड्यावर नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष प्रामुख्याने महाविकास आघाडीत सहभागी असून देखील सावरकरांच्या अपमानाचा विषय महाविकास आघाडीने महामोर्चाच्या अजेंड्यावर घेतलेला नाही, ही बाब येथे अधोरेखित केली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयीच्या राज्यपालांच्या उद्गारांचा विषय राष्ट्रवादीने तापवला आहे. या गृहस्थांविषयी म्हणजे राज्यपालांविषयी केंद्र सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे उद्गार कालच शरद पवारांनी काढले आहेत. पण राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांच्या अपमानाचा उल्लेखही त्यांनी अथवा महाविकास आघाडीने यात केलेला नाही. याचा अर्थच आजच्या महामोर्चाच्या सर्व अजेंडा हा राष्ट्रवादीने ठरवल्याचे दिसत आहे.
आता या महामोर्चासाठी गर्दी जमवण्याचे नियोजन पाहता जास्तीत जास्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यात गुंतलेला दिसत आहे. काँग्रेससह समाजवादी पक्षही यात मम म्हणायला पुढे आलेले आहेत.
काहीच दिवसांपूर्वी मराठी प्रसार माध्यमांनी बातम्या दिल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने या महामोर्चासाठी 20000 हजारांची गर्दी जमवण्याचे नियोजन केले आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीची मूळातच गर्दीचे नियोजन 20000 लोकांचे आहे.
मुंबईत २२७ प्रभागांमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकी 2 बसेस मधून कार्यकर्ते मोर्चासाठी आणण्याचे नियोजन केले आहे. याचा अर्थ शिवसेनेचे जास्तीत जास्त 45000 कार्यकर्ते आणण्याचे हे नियोजन असू शकते. याचा अर्थच अजेंडा राष्ट्रवादीचा आणि कार्यकर्ते जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची असा होतो आहे. आता यात राष्ट्रवादीच्या 20000 कार्यकर्ते जमविण्याच्या नियोजनाचा वाटा आहे का हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
या मोर्चात गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 2 बसेस भरून कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आवाहन नेत्यांनी केले आहे. त्यानुसार मुंबईतील प्रभागांमधून प्रत्येकी 2 बसेस भरून कार्यकर्त्यांना भायखळा येथील रिचडसन क्रुडासपर्यंत आणण्याच्या सूचना तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या मोर्चात नेमकी गर्दी किती?, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मोर्चातल्या संख्येबद्दल दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात येणार आहेत.
भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा असणार आहे. भायखळा ते टाइम्स बिल्डिंगपर्यंत 3.5 किलोमीटरचे हे अंतर आहे. गाडीतून प्रवास केल्यास हे अंतर कापायला १५ मिनिटांचा अवधी लागतो. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे पायी जाताना हे अंतर कापायला महाविकास आघाडीच्या नेत्यांना साधारण ३०-३५ मिनिटांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज आहे.
मोर्चात समाजवादी पक्ष आणि इतर पक्षही सामील होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षांचे ज्या भागांमध्ये नगरसेवक आहेत, त्या भागांमधून प्रत्येकी 1 किंवा 2 बसेस भरुन आणण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकाची असेल तर, ज्या भागांमध्ये या तिन्ही पक्षांचे नगरसेवक नसतील त्या भागांमध्ये ज्या पक्षांचे प्राबल्य असेल तिथे त्या पक्षाच्या तालुका अध्यक्षांना 2 बसेस भरुन आणण्याच्या सूचना केल्या आहे.
मुंबईतील २२७ प्रभागांमधून प्रत्येकी 1 ते 2 बसेस भरुन कार्यकर्ते या मोर्चाला आणण्याच्या प्रमुख सूचना असून याव्यतिरिक्त मग इतर शहरांमधून कार्यकर्तेही आणले जाणार आहेत.
मुंबईत मोर्चाची विशाल गर्दी दिसून यायला हवी म्हणून शिवसेनेने आपल्या प्रत्येक शाखेतून प्रत्येकी ५० ते १०० शिवसैनिक या मोर्चाला उपस्थित राहावेत अशा सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसने दक्षिण मुंबईतील भागांमधूनच अधिकाधिक कार्यकर्ते जमविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईतील सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गर्दी जमवण्यावर अधिक भर असल्याची माहिती मिळत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App