बालहट्टापायी मुंबईची प्राथमिकता बदलली; पेंग्विनच्या टेंडरवरून आशिष शेलार यांचे ठाकरे- पवार सरकार, महापालिकेवर जोरदार टीकास्त्र


वृत्तसंस्था

मुंबई : बालहट्टापायी मुंबई शहराची प्राथमिकता महापौर आणि शिवसेनेने बदलली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते, ॲड आशिष शेलार यांनी ठाकरे- पवार सरकार आणि महापालिकेवर केली. पेंग्विनच्या टेंडरबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर ते बोलत होते. Mumbai’s priorities changed; Ashish Shelar’s strong criticism on Thackeray-Pawar government and municipality on Penguin’s tender issue

आशिष शेलार म्हणाले, ४३७ चौरस किलोमीटरच्या मुंबईतील २०५५ किमीवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॅार्डला २ कोटी म्हणजे १ कोटी ४० लाख, असा मुंबईकरांसाठी फक्त ४८ कोटी खर्च करणार आहेत. पण, तेच एका पेग्विंनसाठी १५ कोटी खर्च करणार आहेत.यावरुन प्रशासकीय रचना बालहट्टासाठी कोणत्या थराला जाऊ शकते, हे दिसतय. यात मुंबईकरांच्या हिताचा विचार नाही. पेग्विंनमुळे उत्पन्न वाढले ,असे आयुक्तांच वक्तव्य म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे, अशी जोरदार टीका केली. पेंग्विन आणा आणि तुमच्या खुर्च्या खाली करा, असे त्यांनी सुनावले.

Mumbai’s priorities changed; Ashish Shelar’s strong criticism on Thackeray-Pawar government and municipality on Penguin’s tender issue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण